राम मंदिरासाठी सरकार अध्यादेश काढणार नाही – मोदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

राममंदिर उभारणीच्या मुद्दय़ावर देशभरात वातावरण तापलेले असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिरासाठी सरकार अध्यादेश काढणार नाही हे स्पष्ट केले आहे.

राममंदिराचा मुद्दा घटनात्मक मार्गाने सोडला जाईल. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होण्याची वाट पाहिली जाईल आणि कायदेशीर प्रक्रियेनंतरच अध्यादेशावर विचार केला जाईल असेही मोदींनी स्पष्ट केले आहे. तसेच 70 वर्ष सत्ता करणाऱ्यांनी राममंदिर प्रलंबित ठेवल्याचेही मोदी म्हणाले. काँग्रेसमुळे राममंदिर रखडले असल्याचा मोदींनी पुन्हा उल्लेख केला.

यापूर्वी मोदी यांनी राममंदिर उभारणीच्या मुद्दय़ावर मौन सोडत राममंदिर काँग्रेसमुळेच होऊ शकले नाही. अयोध्येत राममंदिर व्हावे अशी काँग्रेसची इच्छा नाही असे मोदींनी म्हटले  होते.

कुंभमेळ्यात डंका वाजला; राम मंदिर नाही तर 2019मध्ये मोदी पण नाहीत!

पुन्हा सर्जिकल स्ट्राईक

एका लढाईने पाकिस्तान शहाणा होणार नाही. पाकिस्तानला वठणीवर आणण्यासाठी आणखी वेळ लागेल, असे म्हणत मोदींनी दुसऱ्या सर्जिकल स्ट्राईकचे संकेत दिले आहेत. तसेच पहिल्या सर्जिकल स्ट्राईकबाबत बोलताना मोदी म्हणाले की, हा निर्णय धाडसी होता. सर्जिकल सट्राईकपेक्षा आम्हाला जवानांच्या सुरेक्षाची चिंता होती.