पंतप्रधान मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंचा होणार लिलाव, मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदींना अनेक भेटवस्तू आणि स्मृतिचिन्हे मिळाली आहेत. या वस्तूंचा लिलाव होणार आहे. या लिलावात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले आहे. या लिलावातून मिळालेली रक्कम नमामि गंगे या उपक्रमाला दिली जाणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करून हे आवाहन केले आहे.

मोदींच्या फोटो फ्रेमला 1 कोटी

2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तूंचा इंटरनेटवर लिलाव केला होता. मोदी यांना भेट मिळालेल्या फोटो फ्रेमसाठी तब्बल एक कोटी रुपये मोजण्याची तयारी एका खरेदीदाराने दाखवली होत. शिवाय गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी पंतप्रधानांना भेट दिलेल्या चांदीच्या कलशासाठीही एक कोटी रुपये देण्याची तयारी दुसर्‍या खरेदीदाराने दाखवली होती. मोदी यांना जनता आणि राजकीय सहकार्‍यांकडून मिळालेल्या भेटवस्तू खरेदीसाठी आयोजित ई-लिलावाला देशविदेशातून मोठा प्रतिसाद लाभला होता.