पंतप्रधान मोदी परळीत प्रभु वैद्यनाथचरणी नतमस्तक

8107

बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी गुरुवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आले. महायुतीच्या प्रचारासाठी परळीत आलेल्या पंतप्रधानांनी सभेपूर्वी वैद्यनाथ मंदिर येथे जाऊन वैद्यनाथाचे विधीवत पुजन करुन घेतले दर्शन घेतले. पुरोहित कुमार जोशी, नितीन राजूरकर, अनिल पुजारी,अ शोक पुजारी यांनी पौरोहित्य केले. यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे या त्यांच्यासमवेत उपस्थित होत्या.

modi1

महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच गुरुवारी परळीतील वैद्यनाथ महाविद्यालयच्या समोरील मैदानावर जाहीर सभा झाली. या सभेसाठी विराट जनसमुदाय जमा झाला. सभास्थळी तयार करण्यात आलेल्या तीन हेलिपॅडवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह तीन हेलिकॉप्टरचे 11.30 वाजता लॅडिंग झाले. या ठिकाणी पंकजा मुंडे, खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी त्यांचे स्वागत केले. आपल्या विशेष बुलेटप्रूफ गाडीतून संपूर्ण ताफा कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथ मंदिर येथे रवाना झाले. वैद्यनाथ मंदिर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैद्यनाथाचे विधीवत पुजन करुन घेतले दर्शन घेतले. त्यानंतर सभास्थळी त्यांचे आगमन झाले.

मुंडेंच्या कर्मभूमीत मोदींची सभा, महायुतीच्या उमेदवारांला निवडून देण्याचे आवाहन

आपली प्रतिक्रिया द्या