मोदींनीच वाढवली ‘राफेल’ची किंमत!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

राफेलप्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणाऱया चार याचिका सर्वोच्च न्यायालयाने एकीकडे फेटाळून लावल्या असतानाच 36 राफेल लढाऊ विमानांची किंमत वाढवणारी व्यक्ती दुसरीतिसरी कोणी नसून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आहेत असा दावा ‘कारवान’ या इंग्रजी मासिकाने आज केला. मोदी यांनी राफेल कराराची केवळ घोषणाच केली नाही तर त्या लढाऊ विमानाच्या किमतीत त्यांनी बदल केला असे त्या मासिकाचे पॉलिटिकल एडिटर हरतोष बाळ यांनी लिहिलेल्या एका लेखात म्हटले आहे. हा लेख ‘कारवान’च्या वेबसाइटवर झळकला आहे.