
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात ठार झालेले भाजप आमदार आणि शहीद पोलिसांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून श्रद्धांजली वाहिली आहे. पंतप्रधान मोदींनी नक्षलवाद्यांच्या हल्ल्याचा निषेध व्यक्त करत मृतांना श्रद्धांजली वाहिली. देशासाठी दिलेले बलिदान वाया जाऊ देणार नाही, असेही मोदींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
Strongly condemn the Maoist attack in Chhattisgarh. My tributes to the security personnel who were martyred. The sacrifices of these martyrs will not go in vain.
— Chowkidar Narendra Modi (@narendramodi) April 9, 2019
मंगळवारी छत्तीसगडच्या दंतेवाडा येथे भाजप आमदार भीमा मंडावी यांचा ताफा जात असताना नक्षलवाद्यांनी आयईडीचा स्फोट घडवला आणि गोळीबार केला. या हल्ल्यात भाजप आमदारासह पाच पोलीस शहीद झाले. मोदींनी आपल्या श्रद्धांजली ट्वीटमध्ये आमदार भीमा मंडावी भाजपचे सच्चे कार्यकर्ते होते. आपल्या मेहनत आणि साहसाच्या जोरावर छत्तीसगडमधील लोकांचे त्यांनी सहकार्य केले. त्यांच्या निधनामुळे अतिव दु:ख झाले आहे असे म्हणत मोदींनी त्यांच्या कुटुंबीयांप्रति संवेदना व्यक्त केल्या.
Shri Bhima Mandavi was a dedicated Karyakarta of the BJP. Diligent and courageous, he assiduously served the people of Chhattisgarh. His demise is deeply anguishing. Condolences to his family and supporters. Om Shanti.
— Chowkidar Narendra Modi (@narendramodi) April 9, 2019





















































