‘अब की बार ट्रम्प सरकार’, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकेत घोषणा

1063

हिंदुस्थान हा व्हाईट हाऊसचा खरा मित्र आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे असे व्यक्तीमत्व आहे, त्यांची औपचारिक ओळख करून देण्याची गरज नाही. ते जागतिक नेते असून आंतरराष्ट्रीय राजकारणात त्यांचे मत निर्णायक असते. अब्जावधी लोक डोनाल्ड ट्रम्प यांचा एक-एक शब्द फॉलो करतात, असे मोदी यांनी सांगितले. अमेरिकेतील ह्युस्टनमध्ये ‘हाउडी मोदी’ या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर स्तुतीसुमने उधळली.तसेच या कार्यक्रमात ‘अब की बार ट्रम्प सरकार’ अशी घोषणाही त्यांनी केली.

जगातील दोन मोठी लोकशाही राष्ट्र एकत्र आल्याने हा ऐतिहासिक क्षण असल्याचे मोदी यांनी सांगितले. हिंदुस्थानी नागरिक आणि जगभरात पसरलेले हिंदुस्थानी वंशाची जनता हे माझे कुटुंब आहे. ट्रम्प यांनी 2017मध्ये माझी त्यांच्या कटुंबीयांशी माझी ओळख करून दिली होती. आज या माझ्या कुटुंबाशी माझे सच्चे मित्र डोनाल्ड ट्रम्प यांची ओळख करून देत आहेत, असे सांगितले. त्यानंतर ट्रम्प आणि मोदी यांनी हस्तांदोलन केले. ट्रम्प यांनी मोदी यांना अलिंगनही दिले. अमेरिका आणि हिंदुस्थानचे संबंध दृढ झाले असून आता दोन्ही देशांची मैत्री वेगळ्या उंचीवर पोहचल्याचेही मोदी यांनी सांगितले.

हिंदुस्थानात पंतप्रधान मोदी खूप चांगले काम करत आहेत, असे सांगत ट्रम्प यांनी मोदी यांचे कौतुक केले. या ऐतिहासिक कार्यक्रमाला उपस्थित असल्याचा आनंद असल्याचेही त्यांनी सांगितले. अमेरिका आणि हिंदुस्थानी नागरिक नेहमी मोदी यांच्या पाठिशी आहेत. प्रवासी हिंदुस्थानींचा अभिमान असल्याचेही त्यांनी सांगितले. अमेरिका आणि हिंदुस्थान एकमेकांचा सन्मान करतात, असेही ट्रम्प म्हणाले. दोन्ही देशांतील संबंध या कार्यक्रमाने आणखी दृढ झाल्याचेही ते म्हणाले. अमेरिका आणि हिंदुस्थानात संरक्षण करार होणार असून दहशतवादाविरोधात एकत्रित लढाईची गरजही त्यांनी व्यक्त केली.

आपली प्रतिक्रिया द्या