
बिहारवर कब्जा करण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी मैदानात उतरले आहेत. 23 ऑक्टोबरपासून प्रचाराची धूरा स्वतः नरेंद्र मोदी सांभाळणार असून त्यांच्या 12 जंगी जाहीर सभा होणार आहेत. मोदींच्या मदतीला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येणार आहेत. ते 18 जाहीर सभा घेणार आहेत. मोदी व योगींच्या सभेला व्यासपीठावर जदयूचे नितीशकुमार यांची उपस्थिती असणार आहे.
बिहार विधानसभेसाठी पहिल्या टप्प्याचे मतदान 28 ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे. या निवडणूकीसाठी जदयू आणि भाजप तर राजद व काँग्रेस अशी आघाडी आमनेसामने आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचाराच्या रणधुमाळीत सामील होणार आहेत. 23 ऑक्टोबरपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमध्ये 12 जाहीर सभा घेणार आहेत. 23 ऑक्टोबर रोजी मोदींची पहिली सभा सासाराम येथे दुसरी गया येथे तर तिसरी सभा भागलपूर येथे होणार आहे. 28 ऑक्टोबर रोजी दरभंगा, मुजफ्फरपूर आणि पाटणा येथे मोदींच्या जाहीर सभा होणार आहेत.


























































