पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाला लसीकरणाचा विक्रम; दुपारपर्यंत 1 कोटी डोसचा टप्पा पार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 71 वर्षांचे झाले आहेत. या निमित्ताने भाजपकडून अनेक कार्यक्रमांचे आजोजन करण्यात आले आहे. तसेच भाजपकडून विशेष लसीकरण मोहीमही राबवण्यात येत आहे. ही मोहीम 17 सप्टेंबरपासून 20 दिवस चालणार आहे. मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चालवण्यात आलेल्या लसीकरण मोहीमेमुळे लसीकरणाचा विक्रम नोंदवण्यात आला आहे. शुक्रवारी दुपारपर्यंत तब्बल एक कोटी नागरिकांना कोरोनाचा डोस देण्यात आला आहे.

शुक्रवारी दुपारी 1.30 वाजेपर्यंत एक कोटीपेक्षा जास्त डोस देण्यात आले. शुक्रवारी एक लाखपेक्षा जास्त केंद्रावर लसीकरण करण्यात येत आहे. लसीकरणाला गती देण्यासाठी विविध केंद्रावर आणि भाजपकडूनही लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. शुक्रवारी दुपारपर्यंत 1 कोटी डोसचा टप्पा पार झाल्याने शुक्रवारी दिवसभरात लसीकरणाचा विक्रम होण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस नेते राहुल गांधी, अभिनेता अक्षय कुमार, शाहनवाज हुसैन यांनीही मोदी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. बिहारच्या दरभंगामध्ये 71 नावेमध्ये 71 केक ठेवत पंतप्रधानांना शुभेच्छा देण्यात आल्या. या 71 केकसह 71 किलोचा एक मोठा केकही ठेवण्यात आला होता.

आपली प्रतिक्रिया द्या