
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी सातत्याने चर्चा करत आहेत. आतापर्यंत त्यांनी पाच वेळा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठका घेतल्या आहेत. 17 जून रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत संवाद साधणार आहेत. दुपारी तीन वाजता त्यासाठी वेळ ठरवण्यात आली आहे. त्यासोबतच तमिळनाडू, दिल्ली, गुजरात राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक, बिहार, आंध्र प्रदेश, हरियाणा, जम्मू-काश्मीर, तेलंगणा आणि ओडिशा या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशीही ते चर्चा करणार आहेत.
अर्थव्यवस्था रुळावर येण्यासाठी कोरोनाला रोखावेच लागेल
कोरोना महामारी मुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. चार लॉकडाऊन नंतर केंद्र सरकारला हळूहळू बंधने शिथिल करण्यास सुरुवात केली. आपण कोरोनाला जेवढे रोखू तेवढी अर्थव्यवस्था लवकर रुळावर येईल असा विश्वास व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदुस्थानात कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट 50 टक्क्यांहून जास्त असल्याचे 16 जूनला विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत स्पष्ट केले.
देशातील कोरोना विषाणूचा वाढता फैलाव आणि अर्थव्यवस्थेसमोरील निर्माण झालेल्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत आहेत. या चर्चेचा पहिला टप्पा मंगळवारी पार पडला. यामध्ये 21 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सहभागी झाले होते. यावेळी संवाद साधताना मोदींनी देशातील कोरोनाचा धोका रोखण्यास सोबतच आर्थिक मुद्द्यांवर प्रामुख्याने भर दिला. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यशस्वी झाल्यास सरकारी कार्यालये, खासगी कार्यालये, मार्केट उघडू शकतील. दळणवळणाची साधने सुरू होतील आणि तेवढेच रोजगाराची संधीही उपलब्ध होण्यास मदत होईल असे त्यांनी यावेळी सांगितले
शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर
शेतकऱ्यांच्या उत्पादनासंबंधी मार्केटिंग क्षेत्रात नुकतेच जे बदल करण्यात आले ते शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणार आहेत. यामुळे त्यांना आपलं उत्पादन विक्रीसाठी नवे पर्याय उपलब्ध होतील आणि त्यांचे उत्पन्न वाढू शकेल स्टोरीच्या अभावी त्यांचे नुकसान होते कमी करणे आता शक्य होईल असे ते म्हणाले
























































