
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, हवाई उड्डाण मंत्री किंजरापु राममोहन नायडू, उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उद्योगपती गौतम अडाणी यावेळी उपस्थित होते.
Navi Mumbai, Maharashtra | Prime Minister Narendra Modi felicitated in Navi Mumbai
PM Modi inaugurated Phase 1 of the Navi Mumbai International Airport, built at a cost of around Rs 19,650 crore.
(Source: DD News) pic.twitter.com/JP22TMGZoh
— ANI (@ANI) October 8, 2025
तीन दशकांपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ चर्चेत आहे. लंडनच्या हिथ्रो विमानतळाप्रमाणे या विमानतळाची रचना करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात चारपैकी एका टर्मिनलचे काम पूर्ण झाले आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचा प्रकल्प खर्च १९,६५० कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.