Photo – पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘तेजस’मधून भरारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘तेजस’ या स्वदेशी लढाऊ विमानातून भरारी घेतली आहे.

 

बंगळुरू येथील हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडला मोदींनी आज भेट दिली. या भेटीदरम्यान मोदींनी तेजसमधून उड्डाण घेतले.

 

मोदी यांनी याचे फोटो आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केले आहेत.

आज तेजसमधून उड्डाण घेताना मी अभिमानाने सांगू शकतो की कठोर परिश्रम आणि समर्पणामुळे आपण स्वावलंबनाच्या क्षेत्रात जगात कोणा पेक्षाही कमी नाही, असे मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले. 

या ट्विटमध्ये त्यांनी वायुसेना, डीआरडीओ आणि एचएएलसह सर्व देशवासियांचे अभिनंदनही केले.


दरम्यान, ‘तेजस’ हे स्वदेशी लढाऊ विमान आहे. ‘लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट’ श्रेणीतील 4.5 जनरेशनचे हे टू सिटर विमान आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Marathi Fire (@marathifire)