
देशाची ढासळती अर्थव्यवस्था आणि सीमेवरील चीनची घुसखोरी यावरून तृणमूल कॉँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांनी पंतप्रधानांवर जोरदार निशाणा साधला आहे. आता ना पब्जी पुनरुज्जीकित होणार आहे, ना अर्थव्यवस्था. मोदीजी आता आम्ही काय करायचं? मोदी बाबू जीडीपी बेकाबू, असे ट्विट करत त्यांनी केंद्रातील भाजप सरकारच्या धोरणावर टीकास्त्र सोडले आहे.
जीडीपीचे आकडे जाहीर झाल्यानंतर सीमेवर चिनी सैन्याने घुसखोरी केल्याचे वृत्त समोर आले आहे. चीनकडून आगळीक केली जात असतानाच केंद्राने राष्ट्रीय सुरक्षा आणि नागरिकांच्या गोपनीयेतला धोकादायक असल्याने पब्जीसह 118 चिनी ऍपवर बंदी घातली आहे. यावरून ‘मोदी बाबू जीडीपी बेकाबू’ असे ट्विट करत नुसरत यांनी मोदींना टीकेचे लक्ष्य केले आहे.



























































