PMC बँकेत अडकले होते 15 लाख, महिला खातेदाराची आत्महत्या

पंजाब ऍन्ड महाराष्ट्र बँकेत गेल्या एक वर्षापासून एका महिलेचे 15 लाखहून अधिक रक्कम अडकली होती. ही रक्कम न मिळाल्याने ही महिला नैराश्याच्या गर्तेत होती. काही दिवसांपूर्वी अभिनेता सुशांत सिंह राजपुत याने आत्महत्या केली. त्याने ती अजूनच बैचेन झाली आणि आत्महत्या केली.

मुंबई मिररने याबाबत वृत्त दिले आहे. मुलुंडच्या रहिवासी रचना सेठ या 45 वर्षीय महिलेचे PMC बँकेत खाते होते. बँकेत त्यांनी 15 लाखहून अधिक रक्कम जमा केली होती. त्यांचे पती खासगी कर्मचारी असून त्यांना 20 वर्षाची मुलगी होती. सेठ यांनी 14 वर्षे काम करून आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी हे पैसे जमा केले होते. सेठ यांची मुलगी कशीश ही वाणिज्य शाखेच्या तिसर्‍या वर्गात शिकत आहे. कशिशला एअर होस्टेस बनायचे होतं. त्यासाठी एका एअरलाईन कंपनीमध्ये तिची निवडही झाली होती. फक्त प्रशिक्षणाचे शुल्क भरायचे होते. पण बँकेत पैसे अडकल्याने हे शुल्क भरता आले नाही. यामुळे रचना सेठ खूप दुखी झाल्या होत्या.

त्या रात्री उठून रडत बसायच्या. त्या खूप अंधश्रद्धाळू झाल्या होत्या आणि बाबा बुवांच्या नादी लागल्या होत्या. कधीतरी आपले पैसे परत मिळतील अशी त्यांची आशा होती. मानसोपचार तज्ञाकडे त्यांचे उपचारही सुरू होते. अनेकवेळा कशीस त्यासाठी कॉलेजलाही नाही जायची. कशीश आपल्या आईची पूर्ण काळजी घेत होती.

पण 1 जुलै रोजी रचना सेठ पुन्हा आरडाओरड करायला लागल्या. आताच्या आता जाऊन बँकेतल्या अधिकार्‍यांशी बोलून मी पैसे परत आणते असे त्या म्हणत होत्या. मुलगी कशीश त्यांना समजाव होती की आपण उद्या जाऊ म्हणून. त्याच दिवशी संध्याकाळी सेठ यांचे पती कामावर गेले होते. तर कशीश काही सामान आणण्यासाठी दुकानात गेली होती. तेव्हा रचना सेठ यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

आपली प्रतिक्रिया द्या