HD व्हिडीओंनी मेमरी भरा; 6000mAh ची बॅटरी अन् 1 टीबी स्टोरेजसह एकदम कडक फोन लॉन्च

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कितीही भारी फोन घेतला तरी एचडी व्हिडीओ डाऊनलोड केले की मेमरी फुल होते. त्यामुळे वापरकर्त्याला मनस्ताप सहन करावा लागतो. परंतु आता पोको (Poco) कंपनीने हीच समस्या डोळ्यासमोर ठेऊन एक जबरदस्त फोन लॉन्च केला आहे. या फोनचे खास वैशिष्ट्य म्हणजे यात 1 टीबीपर्यंत स्टोरेज सपोर्ट देण्यात आले आहे. विशेष म्हणजे हा फोन खिशाला परवडणाराही आहे.

पोको (Poco) कंपनीने Poco C40 हा स्मार्टफोन ग्लोबल मार्केटमध्ये लॉन्च केला आहे. यात कंपनीने 13 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा, 6.1 इंचाची एचडी प्लस स्क्रीन, 6000mAh ची दमदार बॅटरी दिली आहे. तसेच स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनरचे फिचरही दिले आहे. याच फोनच्या आणखी खास वैशिष्ट्यांबाबत जाणून घेऊया.

Poco C40 हा स्मार्टफोन काळ्या, पिवळ्या आणि हिरव्या अशा तीन रंगांमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. यात 6.61 इंचाचा (1650 x 720 पिक्सल) एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन देण्यात आली आहे. यात ऑक्टा-कोर जेआर510 प्रोसेसर देण्यात आले असून याला JLQ टेक्नोलॉजीने डेव्हलप केले आहे.

हा स्मार्टफोन 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज, 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजसह लॉन्च करण्यात आला आहे. मेमरी कार्डच्या मदतीने हे स्टोरेज 1 टीबीपर्यंत वाढवता येईल. यात 13 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा देण्यात आला असून सेल्फीसाठी 5 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनची किंमत अद्याप उघड करण्यात आलेली नाही. परंतु रिपोर्टनुसार व्हिएतनाममध्ये हा स्मार्टफोन 11 हजार 700 रुपयांना लॉन्च करण्यात आला आहे.

Poco C40 या स्मार्टफोनचे वजन 204 ग्रॅम आहे. कनेक्टीव्हीटीसाठी यात 4G VoLTE, वाय-फाय 802.11 एसी, ब्लूटूथ 5.0, जीपीएस, ग्लोनास आणि यूएसबी टाइप-सी सारखे फिचर देण्यात आले आहेत. पॉवरसाठी यात 6000mAh बॅटरी देण्यात आली असून हा फोन 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट करतो.