पोकलेनची बकेट अंगावर पडून शेतकऱ्याचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । आष्टी

शेतातील विहिरीचे खोदकाम करत असतांना पोकलेनचे बकेट अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील शेरी खु. येथे घडली असुन दगडू बापू मैंद (वय-50) असे शेतकऱ्याचे नाव आहे.

आष्टी तालुक्यातील शेरी खु. येथील दगडु मैंद यांच्या शेतामध्ये पोकलेनच्या सहाय्याने विहीर खोदण्याचे काम सुरू होते. दि. 06 रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास शेतात विहिरीचे खोदकाम सुरू असतांना पोकलेनची बकेट मैंद यांच्या अंगावर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दगडू मैंद यांच्या पश्चात वडील, पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परीवार आहे.