दरोड्याच्या तयारीतील सराईत टोळीला अटक, गुन्हे शाखेची कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्वेलर्सवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सराईत टोळीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केले. त्यांच्याकडून कोयते, चाकू, मिरचीपूड असे दरोड्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

साहिल दिलीप सांबरे (वय 20 रा. पर्वती), सोमेश्वर भानुदास गायकवाड (वय 20 रा. जनता वसाहत), कृष्णा कुमार चव्हाण (वय 21) , सूरज जांबरे (वय 21), तेजस पवार  (रा. पर्वती दर्शन) असे अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार संतोष क्षीरसागर यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असताना सिंहगड रस्त्यावर असलेल्या गायत्री ज्वेलर्समध्ये टोळी दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानुसार गुन्हे शाखेने सापळा रचून साहिल, सोमेश्वर, भानूदास, कृष्णा, तेजस, सूरजला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कोयते, चाकू, मिरचीपूड सापडली. चौकशीत त्यांनी गायत्री ज्वेलर्सवर दरोडा टाकणार असल्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या पथकाने केली.