
डेक्कन बसस्थानक परिसरात आईसह रिक्षाची वाट पाहत थांबलेल्या तरूणीच्या हातातील 25 हजारांचा मोबाइल हिसकाविणाऱ्या दोघा चोरट्यांना डेक्कन पोलिसांनी अटक केली. ही घटना 23 मार्चला रात्री अकराच्या सुमारास घडली होती.
फरदीन राजेशा मुलाणी (वय 29 रा. तुपे वस्ती, उरळीकांचन) आणि स्वप्निल भागवत बागडे (वय 21 रा. हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरूणी 23 मार्चला आईसह डेक्कन बसस्थानक परिसरात रिक्षाची वाट पाहत थांबली होती. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी तिच्या हातातील 25 हजारांचा मोबाइल हिसकावून नेला.
तरूणीने आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी चोरट्यांचा पाठलाग करून एकाला ताब्यात घेतले. त्यानंतर डेक्कन पोलिसांनी दुसऱ्या चोरट्याला अटक केली. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे, सहायक पोलीस निरीक्षक सौरभ कांबळे यांच्या पथकाने केली.





























































