
सामना ऑनलाईन । मुंबई
खेरवाडी पोलीस ठाण्यात काम करणारे श्री निकम आणि कु. मनिषा विसपुते हे पश्चिम द्रुतगती मार्गावर आपली कामगिरी बजावत असताना सकाळी ८.३०च्या सुमारास एक अज्ञात मोटार चालक बेशुद्ध अवस्थेत पडला असल्याचे दिसून आले होते. त्यावेळी या अज्ञात व्यक्तिजवळ जाऊन विचारपूस केली असता ते पोलीस शिपाई किरण सांगळे बक्कल क्रमांक ०९००८७/नेमणुक आरे पोलीस ठाणे येथे कार्यरत असल्याचे समजले. परंतु त्यांच्या छातीत दुखु लागल्यामुळे अवस्थ वाटत असल्याचे त्यांनी मनिषा विसपुते यांना सांगितले. वेळेचा सुद्धा विलंब न लावता मनिषा यांनी किरण सांगळे यांना अंधेरीतील रुग्णालयात दाखल केले. तर नुकतेच प्रशिक्षण पुर्ण करुन चालक कर्तव्य बजावत असुनही त्यानी पश्चिम प्रादेशिक नियंत्रण कक्षास माहीती दिली व नियंत्रण कक्षाचे परवानगी घेवुन त्यांनी त्यांची जबाबदारी योग्य रितीने पार पाडली. त्यामुळे घडलेल्या प्रसंगी धिरोदात्तपणे वाहन चालवून पोलीस कर्मचारी यांना वेळीच वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कामगीरीचे वरीष्ठानी व सहकारी कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.


























































