पोलिसांनी अडवली रुग्णवाहिका, महिलेचा मृत्यू

2150

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. याकाळात अत्यावशक सेवा सुरू राहतील असे सरकराने सांगितले असताना पोलिसांनी कर्नाटकात अरेरावी केली आहे. पोलिसांनी रुग्णवाहिकेला अडवल्याने एका 70 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे.

News 18 Hindi ने याबाबत वृत्त दिले आहे. कर्नाटकातील कासरगौडा येथील एक महिला आजारी होती. तिला रुग्णवाहिकेतून इस्पितळात नेत होते. तेव्हा जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांनी रुग्णवाहिका अडवली आणि पुढे जाण्यास मज्जाव केला. याच दरम्यान एलपीजी सिलिंडर असलेला ट्रक पोलिसांनी जाऊ दिला. वेळीच उपचार न मिळाल्याने या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला.

पहिली घटना नाही

या पूर्वी मंगळरूत जाणार्‍या एका रुग्णवाहिकेला पोलिसांनी असेच अडवले होते. त्या रुग्णवाहिकेत एक गरोदर महिला होती. पोलिसांनी न सोडल्याने महिलेची रुग्णवाहिकेतच प्रसृती झाली. केरळच्या सीमेवरील अनेक लोक उपचारासाठी कर्नाटकात येतात परंतु सीमेवर तैनात असलेले पोलीस त्यांना परत पाठवतात.

या प्रकरणी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून तक्रार केली आहे. राज्यांच्या सीमेवर अत्यावश्यक सेवांना मज्जाव केला जातो त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी विजयन यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या