छत्रपती शिवरायांबाबत शिवराळ भाषा वापरणाऱ्याला मारहाण प्रकरणी शिवप्रेमींवर चंद्रपुरात गुन्हा दाखल

1614

सोशल मीडियावर सतत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या, आणि औरंगजेबास साहेब बोलणाऱ्या एका व्यक्तीला शिवप्रेमींनी चांगलाच चोप दिला. याचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. या प्रकरणी मारहाण झालेल्या व्यक्तीच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही पोलीस ठाण्यात 25 ते 30 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापेक्षा औरंगजेब मोठा होता, असे विधान हा व्यक्ती सतत करत होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या आणि त्यांच्या कुटुंबाबाबत आक्षेपार्ह लिहिणाऱ्या व्यक्तीला शिवप्रेमींनी शुक्रवारी चोप दिला. याचा व्हिडीओ देखील लाईव्ह केला आणि त्याला माफीही मागायला लावली.

शिवप्रेमींनी चोप दिलेल्या व्यक्तीचे नाव जितेंद्र राऊत असे आहे. हा व्यक्ती गेल्या काही दिवसांपासून आपल्या सोशल मीडिया माध्यम फेसबुकवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करत होता. शिवरायांचा खालच्या भाषेत उल्लेख करत होता आणि औरंगजेबाचा उदोउदो करत होता. शिवप्रेमींनी त्याला समजावून सांगितले असता तो चिथावणीखोर विधान करत होता. अखेर शिवप्रेमींचा संयम सुटला आणि त्याला चोप दिला.

screenshot_2020-03-20-14-40-25-598_com-facebook-katana

जितेंद्र राऊत याच्याशी काही शिवप्रेमींनी संपर्क साधत असे लिखाण बंद करण्याची विनंती केली होती मात्र तो उडवाउडवीची उत्तरे देत होता आणि सतत शिवरायांचा अपमान करत होता. यामुळे संतापलेल्या शिवप्रेमींनी शुक्रवारी त्याला पकडला आणि चोप दिला. तसेच त्याच्या तोंडाला काळे फासत आणि गळ्यात चपलांचा हार घालून त्याचा सत्कारही केला. एवढेच नाही तर त्याला संपूर्ण महाराष्ट्र, छत्रपती घराणे आणि शिवप्रेमींची माफीही मागण्यास लावली. यानंतर त्याला पोलीस स्थानकात नेण्यात आले आणि कारवाईची मागणी करण्यात आली. मात्र त्याला कालच सोडून देण्यात आले. यानंतर त्याच्या पत्नी वनिता राऊत यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी 30 ते 35 वयोगटातील 25 ते 30 लोकांविरोधात भादवि कलम 324, 447, 143, 147, 149, सहकलम 3 (आय) (आर) (एस), 3 (2) (व्ही, ए), 3 (आय) (डी) (ई) अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा सहकलम 135 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

save_20200321_184220

छत्रपती संभाजीराजे भोसले यांचा फुल्ल सपोर्ट!
विमानातून बाहेर आलो आणि मोबाईलमध्ये शिवभक्तांनी छत्रपती घराण्याची बदनामी करणाऱ्या इसमाला चोप दिलेले व्हिडीओ पाहायला मिळाले. माझ्या सुद्धा मनातली इच्छा पूर्ण झाल्याचे समाधान वाटले. अश्या प्रवृत्तीच्या लोकांचा बंदोबस्त जागीच केला तर दुसरा कुणी धाडस करणार नाही, अशी पोस्ट छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केली.

ते पुढे म्हणाले, मी कायदा मानणारा, कायद्याचे पालन करणारा, शिवरायांचा वंशज आहे. पण या प्रकरणात माझा सुद्धा संयम सुटला होता. मी त्या सर्व शिवभक्तांच्या पाठीमागे ठाम उभा आहे ज्यांनी कामगिरी केली. माझ्यासारखे कोट्यवधी शिवभक्त तुमच्या पाठीमागे ठामपणे उभे आहेत. ही मोहीम फत्ते करणाऱ्या सर्व शिवभक्तांचे मनापासून अभिनंदन.

screenshot_2020-03-20-14-45-54-393_com-facebook-katana

आपली प्रतिक्रिया द्या