पोलीस कॉन्स्टेबलने सीएम फंडाला दिले दहा हजार रुपये, मुख्यमंत्र्यांनी मानले आभार

1301

जगभरात सध्या कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. महाराष्ट्रात 335 जणांना कोरोनाची लागण झाली असून 13 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाविरोधातील या युद्धात आर्थिक मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला साद महाराष्ट्र पोोलीस दलातील हेड कॉन्स्टेबल श्रीदर्शन बापूसाहेब डांगरे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दहा हजार रुपयांची मदत दिली आहे. डांगरे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेत दहा हजारांचा धनादेश सुपूर्द केला. त्यांच्या या योगदानाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील दखल घेतली आहे.

श्रीदर्शन बापूसाहेब डांगरे हे डोंगरी येथे तैनात आहेत. तेथील लोकांचे कोरोना व्हायरसमुळे होणारे हाल त्यांना बघवत नसल्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत देण्याचे ठरवले. त्यांच्या या दर्यादिलीबाबत अनिल देशमुख यांनी ट्विट केले आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या जनते तर्फे श्रीदर्शन बापूसाहेब डांगरे यांचं कौतुक केलं व आभार मानले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील श्रीदर्शन बापूसाहेब डांगरे यांचे आभार मानले ‘धन्यवाद श्रीदर्शन डांगरे जी! जनतेच्या सुरक्षेसाठी तुम्ही सेवा बजावत असतानाच तुम्ही केलेल्या आर्थिक मदतीमुळे हे राज्य तुमचे ऋणी राहील’ असे ट्विट मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या