गुहागरात जुगारअड्‌ड्यावर छापा; 12 लाखांचा मुददेमाल जप्त

528

गुहागर तालुक्यातील पालपेणे कुंभारवाडी येथील जुगारअड्‌ड्यावर पोलीसांनी धाड टाकून कारवाई केली. या कारवाईत पोलीसांनी 34 हजारांच्या रोख रक्कमेसह 12 लाख 63 हजारांचा मुददेमाल जप्त केला असून 10 जणांना अटक केली आहे.

चिपळूणचे उपविभागीय अधिकारी सुरज गुरव यांना गुहागर तालुक्यातील पालपेणे कुंभारवाडी येथे जुगार अड्‌डा सुरु असल्याची माहिती मिळाली होती. शुक्रवारी रात्री 12.30 वाजता पोलीस पथकासह उपविभागीय अधिकारी सुरज गुरव यांनी या जुगार अड्‌ड्यावर धाड टाकली. एका घरामध्ये 10 जण जुगार खेळत असताना पोलीसांना सापडले. त्याचबरोबर दोन चारचाकी गाड्या आणि अन्य साहित्य आणि 34 हजारांची रोकड पोलिसांनी जप्त केली.

आपली प्रतिक्रिया द्या