चंद्रपुरात उद्यापासून 137 शिपाई पदे आणि 9 बॅंडसमन जागेसाठी पोलीस भरतीचे आयोजन

चंद्रपुर पोलीस दलाच्या आस्थापनेवर 19 जून रोजी सकाळी 5 वाजेपासुन जिल्हा किडा संकुल, चंद्रपूर येथे पोलीस शिपाई भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. भरतीमध्ये एकुण 137 पोलीस शिपाईची व 9 बॅण्डस्मनची रिक्त पदे भरण्यात येणार आहे.पोलीस शिपाई पदासाठी एकुण 22583 आवेदन अर्ज प्राप्त झाले असुन त्यामध्ये पुरुष उमेदवार 13443 तर महिला उमेदवार 6315 तसेच 2तृतीयपंथी उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहे. बॅण्डस्मन पदाकरीता पुरुष उमेदवार 2176 व महिला उमेदवार 646 तसेच 1 तृतीयपंथी उमेदवारांचे अर्ज प्राप्त झालेले आहे. जिल्हा क्रिडा संकुल, चंद्रपुर येथील प्रवेशद्वारावर उमेदवारांचे ओळखपत्र बघुन आतमध्ये उमेदवारांना शैक्षणीक कागदपत्रे घेवुन प्रवेश दिला जाईल.

 उमेदवारांची हजेरी घेवुन त्यांना छाती / उंची मोजमाप करुन त्यांचे कागदपत्र तपासण्यात येतील व बायोमॅट्रीक हजेरी घेवुन उमेदवार यांना चेस्ट क्रमांक वाटप करुन शारिरीक चाचणी करीता मैदानावर पाठविण्यात येईल. मैदानावर उमेदवारांची शारिरीक चाचणीमध्ये पुरुषाची 100 मिटर / 1600 मिटर व महिलाची 100 मिटर/800 मिटर धावण्याची चाचणी ही कृत्रीम धावपट्टी SYNTHETIC TRACK वर घेण्यात येईल. त्यामध्ये उमेदवारांना SPIKE SHOES वापरता येणार नाही. उमेदवारांनी कोणतेही उत्तेजनार्थ पदार्थाचे सेवन करणार नाही याबाबत त्यांचेकडून हमीपत्र घेण्यात येणार आहे. भरती प्रक्रिया पारदर्शकपणे घेण्याकरीता RFID पध्दतीचा वापर करण्यात आलेला आहे. उमेदवारांनी आमिषाला बळी पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे. जर पावसामुळे एखादे दिवशी मैदानी चाचणी होवु शकली नाही तर त्यांना पुढची सुयोग्य तारीख दिली जाणार आहे.