नियोजनाचा फज्जा, 273 पदांसाठी एकाच दिवशी आल्या सात हजार मुली, दहिसरमध्ये अग्निशमन दलाच्या भरतीत गोंधळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या दहिसरमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये आज प्रचंड गोंधळ झाला. महिलांसाठी राखीव असलेल्या 273 पदांसाठी आज एकाच दिवशी मुंबईसह राज्याच्या कानाकोपऱयातून सात हजारांवर मुली आल्याने प्रशासनाची एकच तारांबळ उडाली. पहाटे 5.30 वाजल्यापासून मुलींना उंचीसह प्राथमिक चाचणीसाठी प्रवेश दिला जात असताना 8 वाजता वेळ संपत आली तरी शेकडो मुली बाहेर होत्या. यातच सुमारे 350 मुलींनी भरतीसाठी आवश्यक असणारी 162 से.मी. उंची असूनही आपल्याला भरती प्रक्रियेतून बाद केल्याचे सांगत जोरदार आंदोलन केले. यावेळी घोषणाबाजी आणि प्रचंड गोंधळ उडाल्याने पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.

महापालिकेच्या अग्निशमन दलात एकूण 910 जवान पदांसाठी 4 जानेवारीपासून दहिसर पश्चिम येथील गोपीनाथ मुंडे मैदानावर ही ‘वॉक इन भरती’ प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये आज विविध प्रवर्गांच्या मुलींसाठी हजर राहण्याचा दिवस निश्चित करण्यात आला होता. यामध्ये अग्निशमन दलाच्या अपेक्षेपेक्षा हजारोंच्या संख्येने मुली आल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली. सायंकाळी 4 वाजेपर्यंत हा गोंधळ सुरू होता. दरम्यान, पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. फक्त आंदोलकांना शांत राहण्याचे आवाहन करून गोंधळावर नियंत्रण मिळवण्यात आले. तर या गोंधळात एका पुरुष उमेदवाराकडून महिला पोलिसावर धावून जाण्याचा प्रकार घडला. त्याच्याविरोधात दहिसर पोलीस ठाण्यात ‘एनसी’देखील दाखल करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांनी सांगितले.

पुनर्तपासणीत 350 पैकी 10 मुली पात्र

भरतीप्रक्रियेतून बाद केल्याचा आरोप करीत आंदोलन केल्याने संबंधित सर्वांची उंची पुन्हा मोजण्यात आली. यामध्ये 350 पैकी 10 मुली पुनर्तपासणी 162 सेमी उंचीमध्ये पात्र ठरल्या. दरम्यान, उंची नीट घेतल्याचे प्रशासन सांगत असेल तर त्या दहा मुली उंचीत पात्र कशा ठरल्या, असा सवाल उमेदवारांनी केला.

शिवसेना मदतीला धावली

अग्निशमन दलाच्या भरतीसाठी राज्याच्या कानाकोपऱयातून, ग्रामीण-दुर्गम भागातून शेकडो मुले येत असताना पालिका प्रशासनाकडून कोणत्याही सुविधा देण्यात आल्या नाहीत. मुलींची भरती एकाच दिवशी सर्व प्रवर्गाच्या मुलींना बोलावण्यात आल्यामुळेच गोंधळ उडाल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या संजना घाडी यांनी केला. ही भरती आधीच ‘फिक्स’ आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तर शिवसेनेच्या मागणीमुळेच आंदोलनकर्त्या सर्व मुलींची उंची नव्याने मोजण्यात आल्याचे आमदार विलास पोतनीस यांनी सांगितले. अशा प्रकारच्या गोंधळाबाबत विधान परिषदेत प्रश्न मांडणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी माजी नगरसेकक हर्षद कारकर, उपकिभागप्रमुख किनायक सामंत, राजू मुल्ला, किधानसभा संघटक अकिनाश लाड, किधानसभा समन्कयक प्रयेश पाटील, सुनील शिंदे, शाखाप्रमुख अक्षय राऊत, सुधाकर राणे, अजित जाधक, शाखा समन्कयक संजय दुबे यांच्यासह किभागातील शिकसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

भरतीप्रकियेतून बाद केल्याबद्दल आक्षेप घेत काही मुलींनी गोंधळ घातला. यावेळी एका पुरुषाने तर महिला पोलिसाच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. या स्थितीत आक्रमक झालेल्या आंदोलकांवर नियंत्रण मिळवले. आज शेवटच्या दिवशी 3300 मुलींची मैदानी चाचणीसाठी निवड झाली असून त्यांना टोकन देण्यात आले आहे. 14 फेब्रुवारीपर्यंत पुढील प्रक्रिया पार पडणार आहे. भरतीत कुणावरही अन्याय झालेला नाही.
– संजय मांजरेकर, प्रमुख अग्निशमन दल अधिकारी