
राजकुमार भगत, न्हावाशेवा
उरणच्या खोपटा पुलावर दहशतवाद्यांशी संबधित मजकुर लिहिल्याची बातमी वर्तमानपत्रात मंगळवारी प्रसिद्ध झाल्यानंतर पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली असून आज या ठिकाणी वेगवेगळ्या तपास यंत्रणांनी येऊन पाहणी केली.
उरणच्या खोपटा पुलाखाली एका पिल्लरवर दहशतवाद्यांशी संबधित मजकूर लिहिल्याची घटना सोमवार उघडकीस आली होती. या मजकूरामध्ये अल बगदादी, इसिस सारख्या दहशतवाद्यांसंदर्भात उल्लेख केले होते. तर धोनी, केजरीवाल असे सांकेतिक उल्लेख देखील केले होते. काही आकृत्यांमध्ये होडी, तसेच जेएनपीटी पोर्ट, विमानतळ, ओएनजीसी या महत्वांच्या आंतराष्ट्रीय प्रकल्पांचा उल्लेख केला होता. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले होते. यापूर्वी 1993 बॉम्बस्फोटावेळी देखिल खोपटा खाडीत अतिरेकी हालचाली झाल्या असल्याचे बोलले जाते. तसेच या खाडीच्या ठिकाणी मोठा खाडी किनारा आहे. काही वर्षापूर्वी हा किनारा म्हणजे तस्करांचा अड्डा म्हणून ओळखला जात असे. त्यामुळे या प्रकरणाच गांभीर्य वाढले होते. विठ्ठल दामगुडे (सहाय्यक पोलीस आयुक्त, पोर्ट विभाग)- या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे. सध्यातरी कुठल्याही दुसऱ्या यंत्रणेकडे हा तपास देण्यात आला नाही.


























































