
मेघालयाच्या सोहरा भागातील 140 वर्षे जुने पोलीस स्टेशन एका ट्रेंडी कॅफेमध्ये रूपांतरित करण्यात आले. कॅफेचे नाव ‘सोहरा 1885’ असे ठेवण्यात आले. सोहरा पोलीस स्टेशनची इमारत 1885 साली बांधण्यात आली. ब्रिटिश राजवटीतील हा तुरुंग होता. तिथे कैद्यांना तात्पुरते ठेवण्यात यायचे. मात्र आता ते खाद्यप्रेमी आणि पर्यटकांसाठी आकर्षण केंद्र बनले आहे. इतिहास आणि आदरातिथ्य यांचे अनोखे मिश्रण यानिमित्ताने पाहायला मिळत आहे. येथे पर्यटक त्यांच्या आवडत्या खाद्यपदार्थांचा आनंद जणू जेलमध्ये घेऊ शकतात. या कॅफेतील निधी पोलीस कल्याणासाठी दिला जाणार आहे. दोन वर्षांपूर्वी कॅफेसाठी औपचारिक प्रक्रिया सुरू झाली. हेरिटेज इमारतीशी सुसंगत डिझाईन करण्यात आले.

























































