राज्यशास्त्र

parliament

राजकारणातील संकल्पना, व्याप्ती, स्वरूप, पारंपरिक आणि आधुनिक दृष्टिकोन, विचारप्रणाली, राजकारणाचे स्वरूप इत्यादी विषयांचा अभ्यास राज्यशास्त्र्ाात येतो. राजकारण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेशी संबंधित fिवविध प्रवाहांचे विश्लेषण करण्यासाठी  ‘राज्यशास्त्र’ या विषयाचा अभ्यास उपयुक्त ठरतो. अलीकडे राजकारणात नव्याने येणाऱया तरुणांची संख्याही वाढत आहे. राजकारणात काहीतरी बदल घडवून आणण्याच्या मानसिकतेतून तरुण वर्ग राजकारणात कार्यकर्त्याची भूमिका निभावत आहे. यातून प्रत्यक्ष राजकारणाचा अनुभव मिळत असला तरी राजकारण घडण्याची प्रक्रिया, राजकारणातील विविध घटक, राजकीय सामाजिकीकरण, राजकीय भरती, राजकीय संस्कृती, पक्षांची विचारसरणींबरोबरच पक्षपद्धती, संसदीय लोकशाही, राजेशाही, हुकूमशाही ही सरकारची विविध रूपेही समजून घेण्याची आवश्यकता असते. ही प्रक्रिया ‘राज्यशास्त्र्ा’ विषयाच्या माध्यमातून समजू शकते.

संधी

> राज्यशास्त्र विषयामध्ये पदवीनंतर नेट/सेट देऊन प्राध्यापक पदासाठी पात्र ठरू शकता.

> केंद्र लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेमध्ये मुख्य परीक्षेसाठी राज्यशास्त्र्ााचा पर्याय निवडता येतो.

> पदवी-पदव्युत्तर पदवी स्तरापर्यंतचा सविस्तर अभ्यास झाल्याने या प्रश्नपत्रिकेमध्ये उत्तम गुण मिळू शकतात.

> याच्या माध्यमातून प्रत्यक्ष राजकारणातील सहभागाबरोबरच राजकारणाशी संबंधित क्षेत्रात करीअर करण्याचे विविध पर्यायही खुले आहेत.

> विविध सामाजिक विषयांवरील जर्नल सुरू करण्याची आणि संशोधन क्षेत्रात काम करण्याची संधी मिळू शकते.

आपली प्रतिक्रिया द्या