मुख्यमंत्र्यांच्या ‘महाजनादेश’ला काँग्रेसचे ‘पोलखोल’ने उत्तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला उत्तर देण्यासाठी काँग्रेस ‘पोलखोल’ यात्रा काढणार आहे. महाजनादेश यात्रेच्या मार्गावरूनच काँग्रेसची ही यात्रा निघणार असून मुख्यमंत्र्यांनी केलेल्या दाव्यांना ‘पोलखोल’च्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले जाणार आहे. काँग्रेसचे नाना पटोले ही यात्रा काढणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी जिथून महाजनादेशला सुरुवात केली त्या मोजरी येथूनच या यात्रेचा शुभारंभ केला जाणार आहे. मुख्यमंत्र्यांची यात्रा जिथे जिथे थांबली तिथेच ही यात्रासुद्धा थांबेल आणि मुख्यमंत्र्यांनी केलेल्या दाव्यांमध्ये सत्य किती आणि दिखावा किती हे तेथील जनतेसमोर मांडले जाईल, असे पटोले यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणा आणि त्यावर प्रत्यक्षात झालेली अंमलबजावणी याचा हिशेब जनतेसमोर मांडण्याचा इशारा पटोले यांनी दिला आहे.