बिग बॉस मराठीचा पहिला विजेता कोण ठरणार? तुमचं मत मांडा

सामना ऑनलाईन । मुंबई

बिग बॉस मराठीचा पहिला सीझन अगदी दणक्यात सुरू झाला. या घरातील स्पर्धकांनी अक्षरश: हिंदीचे दहा सीझन फिके पडतील असे प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. या सीझनचे अवघे दोन दिवस उरले असून आस्ताद काळे, स्मिता गोंदकर, मेघा धाडे, सई लोकूर, पुष्कर जोग आणि शर्मिष्ठा राऊत हे सहा स्पर्धक अंतिम फेरीत विजेतेपदाचे दावेदार ठरले आहेत. प्रेक्षकांनी तर या सहाही जणांना अक्षरश: डोक्यावर घेतले आहे. मात्र यातील एकच विजेता ठरणार आहे. घरातल्या माजी स्पर्धकांनी स्मिता विजेती ठरणार असा दावा केला असला तरी तुम्हाला काय वाटतं, कोण जिंकणार ही स्पर्धा, कोण आहे तुमचा आवडता स्पर्धक… आम्हाला सांगा. सामनाच्या फेसबुक पेजवरील बिग बॉसच्या पोलवर तुमचं मत नोंदवा.

तुमचं मत नोंदविण्यासाठी या लिंकवर क्लिक करा :

https://goo.gl/pTQynG