
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात जोपर्यंत चौकशी होऊन संपूर्ण चित्र स्पष्ट होत नाही तोपर्यंत एखाद्याला दोषी धरणं योग्य होणार नाही. आरोप झाले म्हणून एखाद्याला त्या पदावरून हटवायचं हे कितपत योग्य आहे? चौकशीचा अंतिम अहवाल यईपर्यंत धीर धरा, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सह्याद्री अतिथीगृह येथे मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांनी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर होत असलेल्या बाबत विचारले असता ते म्हणाले, या प्रकरणाची चौकशी सध्या पुणे पोलीस करत आहेत. याप्रकरणी काही लोकांना अटकही करण्यात आलेली आहे, पण जोपर्यंत चित्र स्पष्ट होत नाही तोपर्यंत निष्पाप व्यक्तीचं नाव घेऊन कारण नसताना त्यांना संशयाच्या भोवऱयात टाकणं योग्य नसल्याच त्यांनी स्पष्ट केले.
धनंजय मुंडे यांच्यावरही असेच आरोप झाले होते, त्यावेळी जर माहिती नसताना त्यांचा राजीनामा घेतला असता तर त्यांची बदनामी झाली असती, असं अजित पवार म्हणाले. दरम्यान काैशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनीही राजकारणात आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. प्रशासन योग्य रितिनं काम करत असल्याच स्पष्ट करत चौकशी अहवाल येत नाही तोपर्यंत एखाद्यावर आरोप करणे योग्य नसल्याचं म्हटलं आहे.


























































