
सोलापूर जिह्यात मराठा आरक्षण आंदोलनाचा भडका उडाला असून, मिंधे गटाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांना आज मराठा आंदोलकांनी सोलापूरमधून पिटाळून लावले. भाजपचे आमदार माजी मंत्री सुभाष देशमुख यांच्या घराला घेराव घालत घोषणाबाजी करण्यात आली. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पेट्रोल पंपावर मोदींच्या लावण्यात आलेल्या डिजिटल पोस्टरला आंदोलनकर्त्यांनी काळे फासत निषेध नोंदवला. दरम्यान, एस.टी. बसवर लावण्यात आलेल्या मोदी व मुख्यमंत्री शिंदेंच्या छबीला काळे फासण्यात आले. सायंकाळी अक्कलकोट रोडवर टायर पेटवून आंदोलकांनी रस्ते बंद केले होते.
सोलापूर शहर व जिह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचा आज भडका उडाला. जिल्हा परिषदेसमोरील साखळी उपोषणाला आज मुस्लिम समाजाने पाठिंबा दिला. बहुसंख्य मुस्लिम समाजबांधवांनी नमाजी टोपी घालून भजन केले व सरकारच्या विरोधात तीक्र घोषणाबाजी करण्यात आली.
आमदार म्हात्रे यांना पिटाळले
शिंदे गटाचे कोकणातील शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आज दुपारी सोलापूर जिल्हा परिषदेत येऊन मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे, शिक्षण अधिकारी अंधारे व शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेत असल्याची माहिती आंदोलकांना मिळाली. 100 हून अधिक कार्यकर्त्यांनी बैठकीच्या ठिकाणी जाऊन घोषणाबाजी करत बैठक बंद पाडली. यावेळी कार्यकर्त्यांनी आमदार म्हात्रे यांना जाब विचारला. त्यानंतर पोलीस बंदोबस्तात त्यांना बाहेर काढण्यात आले. कार्यकर्त्यांचा संताप पाहून अवघ्या काही मिनिटांत म्हात्रे यांनी पळ काढला.
दरम्यान, रात्रीच्या सुमारास होटगी रोडवरील माजी मंत्री भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांच्या घराला घेराव घालून घोषणाबाजी करण्यात आली. आमदार देशमुखांनी आंदोलनकर्त्यांना आवर घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. यावेळी देशमुखांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. आंदोलनात सकल मराठा समाजाचे माउली पवार, गणेश देशमुख, राजन जाधव, विनोद भोसले, गणेश डोंगरे, ज्ञानेश्वर सपाटे, प्रताप चव्हाण सहभागी झाले होते.
मराठा आंदोलनकर्त्यांनी आज राष्ट्रीय महामार्गावर पेट्रोल पंपाच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या मोदींच्या पोस्टरलाही काळे फासत निषेध केला, तर महामार्गावर धावणाऱया एसटी बसेस थांबवून त्यावर लावण्यात आलेल्या पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री शिंदे यांच्या पोस्टरलाही काळे फासण्यात आले. करमाळ्यात तहसील कार्यालयासमोर लावण्यात आलेल्या फलकावरील मोदी, शिंदे, फडवणीस आणि अजित पवार यांच्या पोस्टरलाही काळे फासण्यात आले.
करमाळ्यात बसवर दगडफेक
करमाळ्यात एसटी बसस्थानकात पंढरपूर-नगरच्या बसवर दगडफेक करण्यात आली. बससमोर काचेवर लावण्यात आलेल्या मोदींच्या फोटोला लक्ष करत दगडफेक झाल्याने बसचे नुकसान झाले आहे.
तरुणाच्या अंगावर डिझेल ओतले
मराठा आरक्षणाला विरोध केल्याचा राग मनात धरून मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी प्रताप कांचन या तरुणावर डिझेल ओतले. यावेळी त्याला माफी मागायला लावून उठाबशा करण्यास भाग पाडले. यामुळे वातावरण तापले हाते.
नान्नजच्या ग्रामपंचायत सदस्यांचा राजीनामा
सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी व ग्रामपंचायत सदस्यांनी आंदोलन करत राजीनामे दिले. उपसरपंच ज्योती दडे, सदस्या अश्विनी गवळी, प्रकाश चोरेकर, विश्वजित भोसले, विनोद माने यांच्यासह सात सदस्यांनी सरपंच व ग्रामसेवकाकडे राजीनामा दिला.
लऊळच्या उपसरपंचासह सदस्यांचा राजीनामा
लऊळ ग्रामपंचायतचे उपसरपंच मनीषा गवळी, माजी उपसरपंच संजय लोकरे, सदस्य कल्याण गाडे, महेश बागल, सत्यभामा लोकरे, दीपाली मांदे, यशश्री गांधले, निर्मला नलवडे या सदस्यांनी ‘मराठा आरक्षण’ मिळण्यासाठी आपल्या पदाचा राजीनामा सरपंचाकडे दिला आहे.
पंढरपुरात मंत्र्यांच्या फोटोंना काळे फासले
राज्य व केंद्र सरकार आरक्षण देण्यास वेळकाढूपणा करीत आहे. सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी सर्वपक्षीय मराठा समाजाने आंदोलन सुरू केले आहे. पंढरपूर येथील बसस्थानकावर उभ्या असलेल्या एसटी बसवरील जाहिरातीत असलेल्या पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या प्रतिमांना काळे फासले आहे. सरकारने याची दखल घेऊन त्वरित आरक्षण द्यावे; अन्यथा आता फोटोंना काळे फासले आहे. वेळ आल्यास तोंडाला काळे फासू, असा इशारा मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.
मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनात आता माता भगिनी देखील उतरल्या आहेत. साखळी उपोषण, कँडल मार्च काढले जात आहेत. राजकीय नेते, आमदार, खासदार, मंत्री यांना जाहीर गावबंदी करण्यात आलेली आहे.
तिऱ्हे येथे राणे, सदाकर्तेची प्रतीकात्मक अंत्ययात्रा
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मराठा समाजाकिषयी शिवीगाळ केली. याप्रकरणी उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱर्हे येथील मराठा समाजबांधकांनी आक्रमक पकित्रा घेत नारायण राणे आणि आरक्षणाला किरोध करणाऱया गुणरत्न सदाकर्ते या दोघांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी ग्रामस्थांनी ‘मुंडण आंदोलन’ करून नारायण राणे आणि सरकारचा निषेध नोंदकला आहे. संतप्त आंदोलकांनी आज नारायण राणे आणि गुणरत्न सदाकर्ते यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. याकेळी राणेंकिरोधात घोषणा देत त्यांच्या प्रतिमेला चपलेने बडविण्यात आले. त्यानंतर गाकातून प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. सरकारचा निषेध करीत 150 तरुणांनी मुंडण केले.
आमदार बबन शिंदे यांच्या पुत्राच्या खात्यावर पैसे पाठविणे सुरू
आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांनी जरांगे-पाटील यांच्या सभेला जाण्यासाठी 50 हजार रुपये खर्च केल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे पंढरपुरातील मराठा समाजाचे कार्यकर्ते 1 रुपये ते 5 रुपयांप्रमाणे त्यांच्या बँक खात्यावर पैसे पाठवून देत आहेत. शिंदे यांनी श्रेय घेण्याची तजवीज करू नये, असा इशाराच मराठा कार्यकर्त्यांनी दिला आहे.




























































