
सामना प्रतिनिधी । नांदुर्गा
औसा तालुक्यातील गुबाळ ते सास्तुर हा रस्ता दोन तालुके औसा उमरगा तथा दोन जिल्हे लातुर उस्मानाबाद या जिल्ह्याना जोडनारा मुख्य रस्ता असून या रस्त्यावरून दररोज हजारो वहाने ये जा करीत असतात. मात्र हा रस्ता खराब झालेला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग निलंगा मार्फत या रस्त्यावर बेचाळीस लाख रुपये खर्च करून तीन कि.मी. रस्त्याचे काम करण्यात आले. सदरील काम हे मिनार कंन्स्ट्रक्शन लातुर या टेंडर कंपनीकडून करण्यात आले आहे. परंतु काम होऊन पंधरा महिनेही पुर्ण झाले नाहीत तोपर्यंत या रस्त्यामध्ये ठीक ठीकाणी मोठे खड्डे पडले असून रस्त्याला खड्ड्याचे स्वरूप आले आहे. तीन किलोमीटर अंतरामध्ये पाच ते सात ठिकाणी रस्ता हा पुर्णतः खराब झाला असून खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाणही वाढल्याचे दिसून येत आहे. म्हणून या कामाची चौकशी करून कंत्राटदारांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गुबाळ व सास्तुर परिसरातील नागरिकांनी तथा वाहन धारकांनी केली आहे.




























































