सिंदूरलेपनासाठी चार दिवस सिद्धिविनायक मंदिर बंद राहणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

येत्या 25 जानेवारीपासून 1 फेब्रुवारी या कालावधीत प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाच्या मंदिरात माघ श्रीगणेश जयंती महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. दरवर्षी माघ गणेश जयंती महोत्सवाआधी श्री गणेशाच्या मूर्तीवर सिंदूरलेपन करण्यात येते. या वर्षी 15 जानेवारी ते 19 जानेवारी दरम्यान श्रींच्या मूर्तीवर सिंदूरलेपन करण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत भाविकांना श्रींच्या प्रत्यक्ष मूर्तीचे दर्शन घेता येणार नाही. मात्र श्रींच्या प्रतिमूर्तीचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे, अशी माहिती श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासातर्फे देण्यात आली आहे. 20 जानेवारी रोजी श्रींच्या मूर्तीचा प्रोक्षणविधी, नैवेद्य आणि आरती झाल्यानंतर दुपारी एक वाजता भाविकांना गाभाऱ्यातून श्रींचे दर्शन घेता येणार आहे.