
एल्फिन्स्टन रोड पादचारी पुलांच्या दुर्घटनेनंतरही पश्चिम रेल्वेने अजून धडा घेतलेला नाही. पश्चिम रेल्वेच्या प्रभादेवी (तेव्हाच्या एल्फिन्स्टन रोड) स्थानकाच्या दुर्घटनाग्रस्त पुलाजवळच जुनी पाण्याची टाकी अहोरात्र ‘ओव्हर फ्लो’ होऊन पाण्याची नासाडी होत आहे. पाण्याच्या या टाकीचे खांब गंजले असून केव्हाही ही टाकी पडून मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
एल्फिन्स्टन रोडची गंजलेल्या खांबावरती उभारलेली पाण्याची टाकी सातत्याने तुडूंब भरून रात्रंदिवस वाहतच असते. त्यामुळे लोकल पकडण्यासाठी धावणाऱया प्रवाशांना पाण्यातून चालावे लागते. इतके आधुनिक तंत्रज्ञान आले असतानाही रेल्वे या पाण्याच्या नासाडीकडे दुर्लक्ष का करीत आहे. टाकी भरली की नळ बंद करणारा साधा वॉचमनही रेल्वे ठेवू शकत नाही का असे प्रवासी संघटनांचे म्हणणे आहे. परळ पुलाच्या जीर्णेद्धारात पाडलेले ‘तिकीट घर’ अजूनही बांधलेले नाही. त्याऐवजी प्रवाशांसाठी कंटेनरमध्ये उभारलेले तिकीट घरही आता पश्चिम रेल्वेने अचानक बंद केले आहे. एकीकडे निर्बंध हटल्याने प्रवाशांची गर्दी वाढत असताना नव्या 12 मीटर रूंदीच्या दोन्ही स्थानकांना जोडणाऱया पुलावरील एटीव्हीएमही सुरू नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.
2017 मध्ये एल्फिन्स्टन पादचारी पुलावरील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर जुने पादचारी पूल, उड्डाणपुलांची दुरुस्ती केली किंका पाडण्यात आले. 2018 मध्ये अंधेरी स्थानकाजवळील पुलाची पादचारी मार्गिका कोसळून दोनजण ठार झाले होते. त्यानंतर धोकादायक ठवून पाडलेला लोअरपरळ ब्रिज अजूनही बांधला नसून रेल्केच्या हद्दीत उभारलेले पिलर गंजले आहेत.
पुलाच्या पायऱयांची प्रतीक्षा
प्रभादेकी आणि परळ स्थानकातील फलाटांना जोडणारा 12 मीटर रूंदीचा पादचारी पुल बांधण्यात आला आहे. त्याआधी लष्कराने परळ स्थानकाच्या उत्तरेला ब्रिज बांधण्यात आला असून तो निरुपयोगी ठरला आहे. तसेच एल्फिन्स्टन रोडच्या दुर्घटनाग्रस्त पादचारी पुलाचा जीर्णेद्धार जरी केला. मात्र, मध्य रेल्वेच्या प्रवाशांना उपयोगी पडणारा पायऱयांचा उतार दुर्घटनेनंतर तोडला असून अद्याप तो बांधलेला नाही.


























































