
बाहुबली स्टार प्रभासने आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत. आता तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. नुकतेच त्याने हैदराबाद जवळील काझिपल्ली आरक्षित वनातील 1650 एकर क्षेत्र दत्तक घेतले असून त्याचा विकास करण्याची जबाबदारी त्याने उचलली आहे. प्रभासने स्वतŠच आपल्या इंस्टाग्राम पोस्टवरून एका व्हिडिओद्वारे ही माहिती दिली आहे. व्हिडिओमध्ये प्रभास म्हणाला, ‘मी हैदराबादजवळील काझीपल्ली राखीवक वनक्षेत्रातील 1650 एकर क्षेत्र दत्तक घेऊन त्याचा विकास करण्याची जबाबदारी घेतली आहे.


























































