लॉकडाऊनमध्ये प्रभू देवाने गुपचूप उरकले लग्न, उपचार घेता घेता डॉक्टरच्याच प्रेमात पडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रसिद्ध अभिनेता दिग्दर्शक आणि कोरिओग्राफर प्रभू देवा याने मुंबईत राहणाऱ्या एका डॉक्टर सोबत लग्न केले आहे प्रभुदेवाचा भाऊ राजू सुंदरम याने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला. त्याच्या पत्नीचे नाव हिमानी असून ती मुंबईत फिजीओथेरपीस्ट आहे. प्रभूदेवाने लॉक डाऊन मध्ये लग्न केल्याचे देखील सुंदरम यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी प्रभुदेवा पाठ व पायाच्या दुखण्याने त्रस्त होते. त्यावेळी त्यांची भेट मुंबईतील डॉक्टर हिमानी यांच्यासोबत झाली. उपचारादरम्यान नाच प्रभुदेवा व हिमानी यांचे मैत्री वाढत गेली. त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. लग्न करायच्या आधी ते तब्बल दोन महिने एकमेकांसोबत लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये होते. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा लॉक डाऊन होता. त्यामुळे जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत त्या दोघांचा विवाह पार पडला, अशी माहिती सुंदरम यांनी मुलाखतीत दिली.

2011 मध्ये झालेला घटस्फोट 

चित्रपट सृष्टीत प्रभू देवा जितका सुपरहिट ठरला, तितकं त्याचं खासगी आयुष्य यशस्वी ठरलं नाही. त्याचा पहिला विवाह रामलता हिच्याशी झाला होता. 2011 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्या नंतर प्रभू देवाचं नाव नयनतारा या दाक्षिणात्य अभिनेत्रीशी जोडलं गेलं. मात्र, ते नातं फार काळ टिकू शकलं नाही. अनेक अभिनेत्रींसोबत त्यांच नाव जोडलं गेल्यानंतर आता त्याच्या विवाहाच्या चर्चांना उधाण आलं आहे. प्रभू देवा पुन्हा एकदा लग्न करणार असून त्याची भाची हीच त्याची होणारी पत्नी असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.