चर्चा तर होणारच! प्रफु्ल्ल पटेलांनी शेअर केले शरद पवारांसोबतचे ताजे फोटो

pawar-patel

केंद्रातील मोदी सरकारनं ‘विशेष अधिवेशन’ बोलवून नव्या संसद भवनात आजपासून कामकाजाला सुरुवात केली. या सोहळ्यासाठी सर्व खासदारांनी हजेरी लावली होती. यावेळी अजित पवार गटासोबत गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकत्रित फोटो काढला आणि सोशल मीडियावर शेअर केला.

प्रफुल्ल पेटल यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून फोटो शेअर केला असून या फोटोची चांगलीच चर्चा सुरू आहे.

नवीन संसद भवनातील हा अत्यंत उर्जेनं भरलेला दिवस आहे. राज्यसभा चेंबर विशेष आहे आणि हा क्षण आदरणीय शरद पवारासोबत शेअर केल्यानं तो आणखीनच खास बनतो. आणि आता, कॅफेटेरियामध्ये मित्रांसह काही स्नॅक्स आणि मैत्रिचा आस्वाद घेत आहे – खरोखरच लक्षात राहिल असा हा दिवस आहे.

पटेल यांनी दोन फोटो शेअर केले असून एका फोटोते ते शरद पवारांसोबत राज्यसभेच्या चेंबरमध्ये दिसत आहेत. तर दुसऱ्या एका फोटोत नव्या संसद भवनातील कॅफेटेरियात ते सगळ्यांसोबत गप्पा मारताना दिसत आहेत.