फडणवीस लग्नासाठी उतावीळ, पण नवरीच मिळेना; प्रकाश आंबेडकर यांची टीका

3613
prakash-ambedkar

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे लग्नासाठी उतावीळ झाले आहेत; मात्र त्यांना नवरीच मिळेना अशी अवस्था झाली आहे, अशी खोचक टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

संभाजीनगर येथे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडून भाजपचे सरकार आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत का? या पत्रकारांच्या प्रश्नावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लग्नासाठी उतावीळ झाले आहेत, पण त्यांना नवरीच मिळत नाही. यावेळी लॉकडाऊनबाबत भूमिका व्यक्त करताना ते म्हणाले, पाच टक्के लोकांसाठी 95 टक्के लोकांना वेठीला धरणं चुकीचं आहे. लोकांनी लॉकडाऊनचे नियम तोडून आपले व्यवहार सुरळीत करावेत. लॉकडाऊन कायम राहिला तर लोक उपासमारीने मरतील अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

आपली प्रतिक्रिया द्या