प्रकाश आंबेडकर यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट, बोगस मच्छीमार सोसायट्यांवर कारवाईची मागणी

prakash-ambedkar

राज्यात अनेक ठिकाणी बोगस मच्छीमार सोसायटय़ा स्थापन करून त्यांना कंत्राट दिले जात असल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आज केली.

प्रकाश आंबेडकर यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, राजगृहावर झालेल्या हल्ल्यांच्या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी माझी नियमितपणे फोनवर चर्चा होते. आता भेट घेतली. या भेटीत भोई व कोळी समाजाच्या मागण्यांच्या संदर्भातही चर्चा झाली.

बोगस मच्छीमार सोसायटय़ा स्थापन करून मच्छीमारांना कंत्राट दिले जाते हे अतिशय चुकीचे आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी ठोस पावले उचलण्याचे आश्वासन दिल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. मागील काही महिन्यात राज्यात अनुसूचित जातींवर अत्याचार झाले आहे. त्यावरही या भेटीत चर्चा झाली. त्याशिवाय राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि अर्थव्यवस्था या विषयावरही चर्चा झाली.

आपली प्रतिक्रिया द्या