एकनाथ शिंदे यांच्या भावाचा जमीन विकल्याचा दावा फोल, कागदपत्रांचा पुरावा दाखवत RTI कार्यकर्त्याने केली पोलखोल

साताऱ्यातील सावरी येथील ड्रग प्रकरणाने आता वेगळं वळण घेतले आहे. आता ती जागा आपण विकली असे एकनाथ शिंदे यांचे भाऊ प्रकाश संभाजी शिंदे यांचा दावा असला तरी त्यांनी विकत घेतलेल्या त्या जागेचा व्यवहार झाला असल्याचे कुठेही दिसत नाही. त्यामुळे या जागेची मालकी आजही प्रकाश शिंदे यांचीच असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी म्हटले आहे.

कुंभार यांनी या संदर्भात आज समाज माध्यमाद्वारे प्रकाश शिंदे यांचा जमिनीची पोलखोल केली. एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे यांनी 2020 मध्ये ही जागा सुमारे साडेतीन एकर जागा बारा लाख रुपयांमध्ये खरेदी केली आणि त्यानंतर अजून तरी तिचं हस्तांतरण झाल्याची कुठलीही माहिती पुढे येत नाही. त्यामुळे या जागेची मालकी आजही प्रकाश शिंदे यांची असून खरेदीखत अथवा दस्त नोंदणी संदर्भात ताजी कोणतीही माहिती नोंदणी आणि मुद्रांक विभागाकडे नसल्याचे कुंभार यांनी स्पष्ट केले.

ड्रग्समधून मिळालेला पैसा निवडणुकांमध्ये वापरला जातो का? सुषमा अंधारे यांचा गंभीर सवाल

कुंभार यांच्या या माहितीमुळे प्रकाश शिंदे यांनी ही जमीन आपण विकली असल्याचा केलेला दावा सपशेल फोल ठरला आहे.