अमेरिकन नागरिकांचा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर विश्वास उरलेला नाही!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत रशियन हस्तक्षेपाचे पुरावेच सापडल्यामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अमेरिकन नागरिकांचा काडीमात्रही विश्वास उरलेला नाही, असा हल्ला हिंदुस्थानी वंशाच्या अमेरिकन खासदार प्रमिला जयपाल यांनी चढवला आहे. जयपाल या हिंदुस्थानी अमेरिकन प्रतिनिधी सभेवर निवडून जाणाऱ्या पहिल्या हिंदुस्थानी वंशीय महिला खासदार आहेत.

एफबीआयच्या तपासात 2016 च्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत रशियाचा हस्तक्षेप झाल्याचे धडधडीत पुरावे समोर आले आहेत. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या अनेक सहकाऱयांवर एफबीआयने ठपका ठेवल्यामुळे हा प्रकार आपल्याला ठाऊकच नव्हता असे ट्रम्प म्हणूच शकत नाहीत, असे ठणकावून प्रमिला जयपाल म्हणाल्या, अमेरिकन फेडरल कोर्टाने ट्रम्प यांचे माजी सहकारी पॉल मनफोर्ट यांचा जमीन रद्द करीत त्यांना तुरुंगात पाठवले आहे. ट्रम्प यांचे व्यक्तिगत सल्लागार, निवडणूक प्रचाराची धुरा सांभाळणारा व्यवस्थापक, उप व्यवस्थापक आणि व्यक्तिगत वकील या सर्वाना न्यायालयाने या निवडणुकीत भ्रष्टाचारप्रकरणी तुरुंगात धाडले आहे.

ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या राजवटीत अमेरिकन जनतेच्या आरोग्याकडे सरकारचे पार दुर्लक्ष झाले आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना जनतेच्या आरोग्यापेक्षा ट्विट करून सतत चर्चेत राहण्यात जास्त रस आहे.
-प्रमिला जयपाल, अमेरिकन खासदार

summary- pramila jaipal slams trump