प्रणवदांची प्रकृती स्थिर, परंतु गंभीर; लष्करी रुग्णालयाची माहिती

244

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती सध्या स्थिर असली तरी धोका अजून टळलेला नाही, अशी माहिती त्यांच्याकर उपचार सुरू असलेल्या लष्करी रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली. प्रणवदा सध्या अतिदक्षता विभागात असून त्यांना व्हेटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना अस्वस्थ वाटत असल्यामुळे दिल्लीच्या लष्करी रुग्णालयात भरती करण्यात आले. सर्व तपासण्या करण्यात आल्यानंतर त्यांना मेंदूचा विकार असल्याचे स्पष्ट झाले. त्याबरोबरच त्यांचा कोरोना चाचणीचा अहवालही पॉझिटिव्ह आला. प्रणवदांवर तातडीने मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या त्यांना अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. प्रणवदांनी स्वतःच ट्विट करून आपल्याला कोरोनाची बाधा झाल्याचे सांगितले होते. आपल्या संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले होते.

8 ऑगस्टचा दिवस महत्त्वाचा

मुलगी शर्मिष्ठा हिने ट्विटवकर प्रणवदांच्या प्रकृतीची माहिती दिली. ईश्वर त्यांच्यासाठी जे योग्य आहे ते करेल, तोच मला सुख व दुःख स्वीकार करण्याची ताकदही देईल, असे सांगतानाच त्यांनी गेल्या वर्षी 8 ऑगस्ट रोजी प्रणवदांना ‘भारतरत्न’ पुरस्कार मिळाला होता याची आठवण करून दिली.

आपली प्रतिक्रिया द्या