ईडी पान-तंबाखूच्या दुकानासारखी झाली आहे! प्रणिती शिंदे यांचा टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात सध्या भीतीचं वातावरण आहे. मी आज केंद्राच्या विरोधात बोलत आहे. त्यामुळे उद्या सक्तवसुली संचालनालयवाले (ईडी) माझ्या घरी येतील. ईडी आता पान-तंबाखूच्या दुकानासारखी झाली आहे, असा टोला काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी लावला आहे. त्या सोलापूर येथील एका कार्यक्रमात ईडीकडून सुरू असलेल्या कारवायांबाबत बोलत होत्या.

ईडीला आता काम राहिलेले नाही. त्यामुळेच ते कोणाच्याही घरी जातात आणि त्यांना उचलून अणतात, असेही प्रणिती शिंदे म्हणाल्या. सध्या केंद्रीय तपास यंत्रणांकडून निर्दोष लोकांना तुरुंगात टाकले जात आहे. तर शेतकऱयांना चिरडणाऱयांना मोकाट सोडले जात आहे. लोकांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाकडून सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. प्रणिती शिंदे यांनी या वेळी एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीवरही टीका केली. हे दोन्ही पक्ष काहीच काम करत नाहीत, ते केवळ भाजपासाठी काम करतात. लोकांना पेटवायचं आणि भांडणं लावायची हे काम त्यांच्याकडून सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.