अयोध्येत 5 जूनला प्राणप्रतिष्ठा

अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठsची तयारी अंतिम टप्प्यात आहे. राम मंदिरात प्राणप्रतिष्ठेचे अनुष्ठान 3 जूनपासून सुरू होणार असून 5 ते 7 जून यादरम्यान मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली जाईल, अशी माहिती राम जन्मभूमी तीर्थ ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी दिली आहे. मूर्ती अयोध्येत पोहोचल्या असून मंदिरात ठेवण्यात आल्या आहेत. प्राणप्रतिष्ठा आधी म्हणजेच 2 जूनला सरयू तट ते राम मंदिर अशी भव्य कलश यात्रा काढली जाणार आहे.