
हाथरस बलात्कार प्रकरणी देशभरात संतापाची लाट उसळली असताना भाजप समर्थकांकडून मात्र रोज रोज प्रत्यारोप केले जात आहे. त्यातच भाजपच्या आयटी सेलच्या राष्ट्रीय प्रमुख प्रीती गांधी यांनी हे प्रकरण ऑनर किलिंगचे असल्याचा दावा ट्विटरवरुन केला आहे. त्यांच्या या ट्विटवरुन सर्वत्र संताप व्यक्त केला जात असून ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी देखील कडक शब्दात त्यांचा समाचार घेतलाय. भाजपाच्या महिलांना लाज राहिली नाहीय का? असा संतप्त सवाल त्यांनी यानिमित्ताने उपस्थित केला आहे. गांधी यांनी केलेल्या ट्विटनुसार आरोपी आणि पीडितेने एकमेकांना 100 हून अधिक कॉल केल्याची माहिती देत त्यांनी ही शंका उपस्थित केली आहे.


























































