
राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणारी पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (आठवी) परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही परीक्षा 31 जुलै रोजी होणार आहे. परीक्षा परिषदेने आधी जाहीर केल्याप्रमाणे 20 जुलै रोजी ही परीक्षा राज्यातील सर्व जिह्यांमध्ये एकाचवेळी घेण्यात येणार होती. मात्र सद्यस्थितीत राज्यातील अनेक भागात पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून बहुतांश ठिकाणी भूस्खलनामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वाहतुकीसाठी येणाऱया अडचणी लक्षात घेता आता परीक्षा 31 जुलै रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना नवे प्रवेशत्र मिळणार नसून आधी दिलेल्या प्रवेशपत्राआधारे परीक्षा द्यावी, अशा सूचना परीक्षा परिषद आयुक्त शैलजा दराडे यांनी दिल्या आहेत.



























































