प्रीमियर हॅण्डबॉल लीग 24 डिसेंबरपासून, जयपूरमध्ये 18 दिवसांत 33 लढतींचा धमाका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हॅण्डबॉल या खेळाच्या पहिल्यावहिल्या प्रीमियर लीगचा बिगुल दणक्यात वाजला आहे. हॅण्डबॉल फेडरेशन ऑफ इंडियाच्या अधिपत्याखाली खेळवण्यात येणारी ही स्पर्धा 24 डिसेंबरपासून जयपूर येथील सवाई मानसिंग इनडोअर स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. पुढल्या वर्षी 10 जानेवारीला या स्पर्धेच्या जेतेपदाचा फैसला होईल. 18 दिवसांमध्ये 33 लढतींचा थरार क्रीडाप्रेमींना अनुभवायला मिळणार आहे.

प्रीमियर हॅण्डबॉल लीगच्या पहिल्या मोसमात सहा संघांमध्ये जेतेपदाची झुंज रंगणार आहे. तेलंगणा टायगर्स, यूपी आयकॉन्स, महाराष्ट्र हॅण्डबॉल हसलर, किंग हॉक्स राजस्थान, बंगाल ब्ल्यूज, पंजाब पिटबुल्स या संघांमध्ये अजिंक्यपदासाठी रस्सीखेच लागणार आहे. या स्पर्धेत 80 पेक्षा जास्त खेळाडूंचा सहभाग असणार आहे. प्रत्येक संघात 14 खेळाडूंचा समावेश असणार आहे.