Photo – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू शनिशिंगणापूर दौऱ्यावर; चौथऱ्यावरुन घेतलं शनिदेवाचं दर्शन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या शनिशिंगणापूर दौऱ्यावर आहे. आज त्यांनी शनिशिंगणापूर येथे चौथऱ्यावरून शनिदेवाचं दर्शन घेतले आणि मूर्तीस तैलाभिषेकही केला.

यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्यासह मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आदी मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रपतींनी मंदिरात आगमन झाल्यावर शनैश्वर मूर्तीचे दर्शन घेतले व उदासी महाराज मठात त्यांनी अभिषेकही केला.

दर्शन झाल्यानंतर प्रसादालयात त्यांनी प्रसादाचे सेवनही केले.

नगर जिल्हा प्रशासनाच्यावतीने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रपतींचा सत्कार केला.

श्री शनिशिंगणापूर संस्थानचे अध्यक्ष भागवत बनकर, उपाध्यक्ष विकास बनकर, कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ दरंदले यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना शनिदेवाची प्रतिमा भेट देऊन त्यांचा सन्मान केला.