साधु संतच राममंदिर उभारणार…महंत नरेंद्र गिरी यांची घोषणा

42

सामना ऑनलाईन। प्रयागराज

अयोध्येत राम मंदिर निर्माणाच्या मुद्द्यावरून देशभरात वातावरण तापलेले असतानाच ”राम मंदिर उभारण्याची भाजपची मानसिकता नाही. यामुळे कुंभमेळा संपताच साधुसंत अयोध्येत राम मंदिराच्या निर्माण कार्यास सुरुवात करतील अशी घोषणा अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महंत नरेंद्र गिरी यांनी केली आहे.

भाजप लोकसभा निवडणुकीसाठीच राम मंदिरचा मुद्दा उपस्थित करीत आहे. पण आम्ही आता राममंदिर उभारण्याचा निर्णय घेतला असून कुंभमेळा समाप्त झाल्यानंतर सगळे साधुसंत अयोध्येकडे कूच करतील आणि राम मंदिर निर्माण कामास सुरुवात करतील. असे महंत गिरी यांनी म्हटले आहे.

धर्म संसद प्रत्येक वर्षी होते, पण त्यातही राम मंदिरावर तोडगा निघणार नाही. त्यामुळे अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या बैठकीनंतर अयोध्येकडे मोर्चा वळवणार असल्याचे काही दिवसांपूर्वीच गिरी यांनी म्हटले होते.

आपली प्रतिक्रिया द्या