पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या, 10 ऑगस्टला वायनाड दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते भूस्खलनातील पीडितांच्या कुटुंबीयांना भेटणार आहेत. पंतप्रधान मोदी विशेष विमानाने कन्नूर जिह्यात पोहोचतील. या ठिकाणाहून ते हेलिकॉप्टरने भूस्खलन भागाची हवाई पाहणी करतील. यावेळी ते काही शिबिरांचा दौरा करतील. सध्या 10 हजारांहून अधिक लोकांनी शिबिरात आश्रय घेतला आहे.